20 दिवसानंतर प्रकट झालेल्या किम जोंगच्या नवीन आणि जुन्या फोटोवरून सोशल मीडियात गोंधळ


उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा सुमारे रहस्यमयपणे अदृश्य राहिल्यानंतर तब्बल 20 दिवसांनंतर जगासमोर आला. तोपर्यंत जगभरातील मीडिया आणि सरकारच्या किम जोंग उन याचे स्वास्थ्य हा आवडीचा विषय बनला होता. जेव्हा मागील आठवड्यात तो 20 दिवसांच्या अंतरानंतर एका फॅक्टरीच्या उद्घाटनाच्या दरम्यान पुन्हा लोकांसमोर आला, तेव्हा त्याच्या आरोग्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला असेच वाटत होते.


पण, तसे सध्यातरी घडत नसल्याचे दिसत नाही, कारण हुकूमशहा किम जोंग याच्याबद्दल नवीन गोष्टी समोर येत आहेत, याची पुष्टी झाल्यास जगभरात एकच खळबळ निर्माण होऊ शकते. किम जोंगबद्दल एक नवीन वृत्त समोर आले असून उद्घाटन समारंभात जी व्यक्ती जाहीरपणे उपस्थिती झाली, तो खरा हुकूमशहा नव्हता तर उलट तो त्याचा बॉडी डबल असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, लक्षात ठेवा की हा फक्त एक दावा आहे, ज्याच्या सत्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.


किमच्या नवीन आणि जुन्या फोटोचे सोशल मीडियावर यूजर्स विश्लेषण करत आहे. बॉडी डबल वापरला गेला आहे की नाही हे समजण्यासाठी यूजर्स दात आणि कानांवर विशेष भर देत आहेत. असाच दावा ब्रिटनचे माजी खासदार लुईस मेंश यांनीही केला आहे. त्यांनी लिहिले की त्या फोटोंमध्ये दात आणि इतर गोष्टींमध्ये स्पष्ट फरक दिसत आहे. बारकाईने बघितल्यास तो फरक तुम्हालाही कळेल. माजी खासदार लुईस मेन्शने लिहिले की ही ती व्यक्ती नाही. शिवाय, राज्य माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये किम जोंग उन यांचा बॉडी डबल असल्याचा सोशल मीडियावरील काही लोकांचा असा विश्वास आहे. हा दावा त्यांच्या दातांमध्ये दृश्यमान फरक, मनगटावर चिन्ह आणि कानाच्या आकाराच्या आधारे केला जात आहे.


11 एप्रिलपासून बेपत्ता असलेला हुकूमशहा 1 मे रोजी पहिल्यांदा राजधानी प्योंगयांगजवळ सांचोन येथील खताच्या कारखान्यात एका कार्यक्रमात दिसला. यावेळी, तेथील माध्यमांनी किम जोंग उन याचे अनेक फोटोज प्रसिद्ध केले होते. सोशल मीडियावर काही यूजर्स या फोटोंना मुद्दा बनवून किमच्या मनगटावर ठिपका दाखवून खरा आणि बनावट यांच्यातील फरक दाखवत आहेत. दरम्यान, किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांचाही बॉडी डबल असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment