दोस्तीला जागला इस्रायल; भारताला देणार प्रतिबंधक लस बनवण्याची पद्धत


नवी दिल्ली – इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी, कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याच्या निर्णायक टप्प्यावर आम्ही पोहोचलो असून ही सर्व माहिती निश्चित आम्ही जगासोबत शेअर करु, असे सांगितले आहे. त्याचबरोबर आम्ही भारताला देखील लस निर्मितीची सर्व माहिती देणार आहोत.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने पूर्ण केला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या आहेत का? तसेच याची लस विकसित करण्यासंबंधीची माहिती इतरांना देणारा का? या प्रश्नावर रॉन मल्का बोलत होते. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश कोरोना व्हायरसमुळे अधिक जवळ आले असून कोरोनाचा कसा सामना करायचा? याबद्दलचे अनुभव दोन्ही देश एकमेकांना शेअर करत असल्याचेही मल्का यांनी सांगितले.

Leave a Comment