कोरोना : आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल भारतात सुरू

देशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, पारंपारिक औषध जसे की अश्वगंधा, यष्टीमधू, गुडूची पिप्पली या औषधांद्वारे क्लिनिकल ट्रायल आजपासून सुरू करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, आयुष औषधे अश्वगंधी, यष्टीमधून, गुडूची पिप्पली, आयुष-64 यांचे क्लिनिकल ट्रायल आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या भागात काम करणाऱ्या लोकांवर आजपासून सुरू करण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि टेक्नोलॉजी मंत्रालय मिळून आयसीएमआरच्या मदतीसह काउंसिल ऑफ सायंटेफिक अँढ इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत काम करत आहे. या ट्रायलचा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचा आयूष मंत्रालय अभ्यास करत आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला असून, 1700 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment