गाण्याच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांची कोरोना वॉरिअर्संना मानवंदना


राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कोरोना वॉरिअर्सचे आभार मानले आहेत. या गाण्याचे ‘तू मंदिर, तू शिवाला’ असे शीर्षक आहे. त्यांचा यामागे सध्याच्या कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी हा उद्देश आहे.

नेहमीच रसिकांचे लक्ष अमृता फडणवीस यांची गाणी वेधून घेतात. याआधी कोरोनावर आधारित गाणी सलमान खान, अजय देवगण या सेलिब्रिटींनीसुद्धा रिलीज केली आहेत. हे गाणे आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केले असून गाण्याचे बोल राजू सपकाळ यांनी लिहिले आहेत. हे गाणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी समर्पित केले आहे.

केंद्र सरकारने कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी शुक्रवारी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असला, तरी त्यापूर्वीच केंद्राने देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासंदर्भातील निर्णयाला परवानगी दिली. पहिली श्रमिक रेल्वे शुक्रवारी कामगारांना घेऊन धावली. सरकारच्या निर्णयामुळे अडकलेल्यांना दिलासा मिळाला. दुसरीकडे देशभरात अनेक ठिकाणी जिल्हे रेड झोनमध्ये असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment