राज्य सरकारच्या ‘वरळी पॅटर्न’चे केंद्रीय पथकाकडून कौतुक


मुंबई : मुंबईतील अनेक दाटवस्तीच्या परिसरांमध्ये वरळीतील कोळीवाड्याचा नंबर लागतो. 50 हजारांहून जास्त लोकसंख्या असलेला हा परिसर आहे. अगदी दाटीवाटीची अशी येथील घेरांची रचना असल्यामुळे जर या ठिकाणी कोरोनाचा प्रकोप झाला असता तर वरळीमधील चित्र खूप भयानक असते. पण जी साऊथमधील या परिसरात महापालिकेने राबवलेल्या ‘वरळी पॅटर्न’ची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. या पॅटर्नचे केंद्राच्या पथकानेही कौतुक केले आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरळीत खूप चांगल्या प्रकारे काम करत या कोरोनाला रोखण्यात चांगल्यापैकी यश मिळवले आहे. वरळीतील कोळीवाडा सारखा दाट वस्तीचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर येथे एनएसयूआयमध्ये 500 बेडचे क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांना खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. गरम पाणी, जेवण या सर्व गोष्टींसोबत रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी योगाचेही प्रशिक्षण येथे दिले जात आहे.

लोकसंख्येची घनता जास्त असलेला वरळीत कोळीवाडा हा परिसर आहे. असे असूनही येथील परिस्थिती प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. केंद्राच्या पथकानेही याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जी दक्षिण विभागाच्या कामगिरीवरुन शाबासकीची थाप दिली आहे. ही सर्व टीम वॉर्ड अधिकारी शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. केंद्राचे दुसरे पथकही वरळी भेट देऊन गेले, त्यांनीही प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आहे. हे पथक वरळी पॅटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवणार आहेत. तर, राज्य सरकारकडे याचा आराखडा महापालिका पाठवणार आहे.

Leave a Comment