बॉलिवूड अभिनेता इरफान खान काळाच्या पडद्याआड


बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे याचे निधन झाले असून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याने वयाच्या 54व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी इरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचे समजले होते. या आजाराबाबत 2017च्या जून महिन्यात समजल्यानंतर या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी इरफान परदेशात गेला होता. आपल्या त्याच्या आजाराबाबतची माहिती इरफानने स्वत: सोशल मीडियावरुन दिली होती.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये इरफानच्या आई सईदा बेगम यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. पण इरफान लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नव्हता. त्याने व्हिडिओ कॉलवरुनच आपल्या आईचे अंतिम दर्शन घेतले होते.

Leave a Comment