एकेकाळचा अब्जाधीश तब्बल 23 वर्षांपासून या बेटावर राहत आहे एकटा

सध्या जगभरात लॉकडाऊनमुळे लोक एका महिन्यातच घरात राहून वैतागले आहेत. मात्र एक अब्जाधीश आपली सर्व संपत्ती गमवल्यानंतर मागील दोन दशकांपासून एकटाच बेटावर राहत आहे.

76 वर्षीय डेव्हिड ग्लिशम यांनी मार्केट कॅशमध्ये आपली सर्व संपत्ती गमवली. 1997 मध्ये संपत्ती, कुटुंब गमवल्यानंतर डेव्हिड यांनी नॉर्थ ऑस्ट्रेलियाच्या रेस्टोरेशन बेटावर राहण्यास सुरूवात केली.

2020 मध्ये सर्वच जण घरात क्वांरटाईन आहेत, मात्र डेव्हिड यांच्यासाठी परिस्थिती आधी सारखीच आहे. या परिस्थितीमध्ये कसे राहावे यासाठी डेव्हिड यांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत.

डेव्हिड यांनी सांगितले की, बेटावर अन्न आणि पाण्या व्यतिरिक्त सोलर पॉवरवर चालणारे इंटरनेट, चांगली पुस्तके आणि सोबतीसाठी दोन महिलांचे पुतळे आपल्या अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत ठेवतात.

आपल्यासाठी पाण्याची सोय ते पावसाचे आणि पर्वतांद्वारे वाहून येणाऱ्या पाण्याद्वारे करतात. अन्नसाठी ते मासे पकडतात, तसेच बेटावर उपलब्ध नारळ. चेरी, बदाम आणि मनुके देखील खातात. सोबतच आग पेटविण्यासाठी फ्लिंटस्टोनचा वापर करतात.

डेव्हिड वर्षातून एकदा बाहेरच्या मुख्य प्रदेशात देखील प्रवास करतात. या काळात ते अधिक काळ टिकणारे पदार्थ, सोबत टूथपेस्ट, साबण आणि टॉयलटे पेपर खरेदी करतात. सुरूवातीला डेव्हिड हे उद्योगाच्या दृष्टीने या बेटावर आले होते. मात्र ते या जागेच्या प्रेमात पडले.

Leave a Comment