स्मार्टफोनमधील डार्क मोड तुमच्या डोळ्यांसाठी ठरू शकते घातक!


स्मार्टफोनमधील डार्क मोड फिचर मागील काही दिवसांपासून फार लोकप्रिय झाले असून त्यात स्मार्टफोन युजर्संसाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि ट्विटरवरनेही डार्क मोड ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर सिस्टम-व्हाइड डार्क मोडचे ऑप्शन अॅन्ड्रॉइड 10 मध्ये गुगलने दिले आहे. असे सांगितले जाते की फोनची बॅटरी डार्कमोडमुळे दीर्घकाळ चालते आणि स्क्रिन पाहताना त्रासही होत नाही. तर या डार्कमोड फिचरमुळे अनेक गंभीर समस्यांचाही सामना करावा लागतो. ज्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.

स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या अॅप्ससाठी सध्या डार्कमोड फिचर ट्रेन्डिंगमध्ये आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले डार्क मोड ऑन झाल्यानंतर डार्क म्हणजेच, ब्लॅक कलरमध्ये दिसू लागतो. ज्यामुळे डोळ्यांवर कमी प्रकाश पडतो. परिणामी बराच वेळ तुम्ही न थकता फोनचा वापर करू शकता. परंतु, डार्क मोड दिवसा जरी बरे वाटत असले तरी रात्री ते नुकसानदायी ठरत आहे.

तुम्ही बऱ्याच काळापासून जर आपल्या स्मार्टफोनवर डार्क मोड फिचरचा वापर करत असाल तर त्यानंतर तुमच्या डोळ्यांना त्याची सवयच लागून जाते. काही जणांना व्हाइट कलरमध्ये टेक्स्ट वाचणे आवडते. पण तुम्ही जेव्हा लाइट मोडवर असता, त्यावेळी तुमच्या डोळ्यांवर याचा परिणाम होतो. तसेच नजर कमजोर होते. डार्क मोडचा अतिरेक डोळ्यांच्या आजाराचे कारण ठरते. लाइटपासून डार्क टेक्स्टमध्ये स्विच केल्यानंतर तुमचे डोळे अचानक झालेला बदल स्विकारू शकत नाहीत. अशातच ब्राइटबर्नची स्थितीही दिसू शकते.

याबाबत अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनने सांगितल्यानुसार, अस्टिगमेटिज्म नावाचा आजार डार्क मोडचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये असल्याचे समोर आले आहे. एक डोळा किंवा दोन्ही डोळ्यांच्या कॉर्नियाचा आकार ज्यामध्ये काही प्रमाणात बदलून जातो आणि युजरला काहीसे धुसर दिसू लागते. त्यामुळे अनेकजण व्हाइट बँकग्राउंडवर ब्लॅक टेक्स्टच्या तुलनेत ब्लॅक बॅकग्राउंडवर व्हाइट टेक्स्ट सहजपणे वाचू शकत नाही. डिस्प्ले ब्राइट असल्यामुळे आयरिस लहान होते, ज्यामुळे कमी प्रकाश डोळ्यांवर पडतो. डार्क डिस्प्लेच्या बाबतीत हे उलट होते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

जर डार्कमोडमुळे डोळ्यांना नुकसान होऊ द्यायचे नसेल तर डार्क मोड आणि लाइट मोडमध्ये स्विच करत रहावे. जेवढे शक्य असेल तेवढे स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा ब्राइटनेस कमीच ठेवावा. दिवसा लाइट मोडचा तर रात्री डार्क मोडचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment