वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनची 2500 पीपीई किट्स अन् लाखोंची मदत


कोरोना व्हायरस विरोधात लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मदतीचा हात पुढे केला होता. विद्या बालन आता पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढे आली आहे. विद्या बालनने कोरोना विरूद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी मोठी रक्कम जमा केली आहे. यासंदर्भातील माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली. विद्याने सांगितले की, गरजुंच्या मदतीसाठी आपण फंड गोळा केला आहे. तिने यासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, ती फार आनंदी आहे की, डॉक्टरांसाठी आपण 2500 हून अधिक पीपीई किट्स आणि 16 लाख रूपयांचा मदतनिधी गोळा केला आहे.

विद्या बालनने सेलिब्रिटी शाउट-आउट प्लेटफॉर्म ट्रिंगसोबत, दृष्यम फिल्मचे मनीष मुंद्रा आणि फोटोग्राफरसोबतच चित्रपट निर्माते अतुल कास्बेकर यांच्यासोबत एकत्र येऊन हा मदतनिधी गोळा केला आहे. इन्स्टाग्रामवर विद्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने ज्यामध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे, व्हिडीओमध्ये विद्या म्हणते की, आज सकाळी मला एका चांगल्या बातमीमुळे जाग आली. आम्ही 2500 पीपीई किट्सपर्यंत पोहोचलो आहोत. तसेच काही तासांतच 16 लाखांहून अधिक रूपये एकत्र करण्यात आले आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाने जे दान केले आहे, त्यातूनच हे शक्य झाले. तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना अनेकांचे आशीर्वाद. हीच खरी भारताची एकता आणि भावना आहे.

दरम्यान, विद्या बालनने याआधीही स्वतः 1000 पीपीई किट्स डोनेट केले आहेत. यासंर्भातील माहिती तिने इन्स्टाग्रामवरूनच दिली होती. विद्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले होते की, नमस्ते, आपण आपल्या हेल्थ वर्कर्सना पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट) किट #WarAgainstCovid19 मध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी देत आहोत. मी आपल्या मेडिकल स्टाफसाठी 1000 पीपीई किट्स दान करणार आहे. इतर पीपीई किट्स आणि मदतनिधी गोळा करण्यासाठी ट्रिंगसोबत एकत्र येऊन काम करत आहे. देशभरात आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 1000 पीपीई किट्सची तत्काळ गरज आहे.

Leave a Comment