दक्षिण कोरियाचा दावा; किम जोंग अद्याप जिवंत


सध्या कोरोना या जीवघेण्या व्हायरससोबतच सगळ्या माध्यमांमध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन ब्रेन डेड असल्याच्या बातम्या झळकत आहेत. पण ते वृत्त उत्तर कोरियानंतर आता दक्षिण कोरियाने देखील हे वृत्त फेटाळले असून किम जोंग उन हे जिवंत असून त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी याबाबत सांगितले की, किम जोंग उन याची प्रकृत्ती उत्तम असून ते जिवंत आहेत. 13 एप्रिलपासून किम वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत.

याआधी उत्तर कोरियाने किम जोंग यांच्या मृत्यूबाबतचे वृत्त फेटाळले होते. उत्तर कोरियाच्या सरकारी प्रवक्त्याने देशाचा कारभार सुरळीत सुरू असल्याचे सांगितले होते. पण किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी जास्त माहिती देणे टाळले होते. किमच्या तब्येतीविषयी काही अफवा उडवल्या जात आहेत, पण त्यात तथ्य नसल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले होते.

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून उलट सुलट बातम्या येत होत्या. पण आता थेट त्यांच्या शेजारी आणि उत्तर कोरियाचा कट्टर वैरी मानला जाणाऱ्या दक्षिण कोरियाकडूनच तो जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अजब आणि टोकाचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग नेहमी चर्चेत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव उत्तर कोरियामध्ये होऊ नये यासाठी त्यांनी एक वादग्रस्त निर्णय घेतला होता. त्याची जगभरात चर्चा झाली होती. ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस उत्तर कोरियामध्ये पसरु नये यासाठी कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपाचार करण्याआधी त्याला थेट गोळ्या झाडण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले होते.

चीनमध्ये कामानिमित्त उत्तर कोरियातील एक व्यावसायिक गेला होता. त्याला तेथे कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. चीनमधून परतल्यानंतर या व्यक्तीकडून इतर नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्या व्यावसायिकाला गोळ्या घालण्याचे आदेश किम जोंगने दिले होते.

Leave a Comment