लॉकडाऊनः ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या मदतीने ‘जिओमार्ट’ची सेवा सुरू

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने काही दिवसांपुर्वीच रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 43,574 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. आता रिलायन्सने व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने आपले ऑनलाईन ई-कॉमर्स पोर्टल जिओमार्टची सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिओने आपली सुविधा सर्वसामान्यांसाठी सुरू केली आहे. एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, जिओमार्टची सुविधा घेण्याची ईच्छा असलेले ग्राहक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8850008000 ला आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल.

या नंबरवरून ऑर्डरसाठी ग्राहकांना एक लिंक येते. एकदा ऑर्डर प्लेस झाल्यानंतर कंपनी याला व्हॉट्सअ‍ॅपवर एका ग्रोसरी स्टोरशी शेअर करते. ग्राहकांना ऑर्डरचे नॉटिफिकेशन देखील येते आणि सोबतच स्टोरची सविस्तर माहिती देण्यात येईल.

सध्या याबाबत रिलायन्सने अधिकृत माहिती दिलेली नाही. रिलायन्स रिटेलने या वर्षी जानेवारीमध्ये जिओमार्टचे नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात पायलट टेस्टिंग सुरू केले होते.

Leave a Comment