युवराज-धोनीमध्ये एकाची निवड करणे हे आई-वडिलांमधून एकाला निवडण्यासारखे – बुमराह

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आयपीएल देखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने भारतीय क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासह घरी वेळ घालवत आहेत. तर काही खेळाडू इंस्टाग्रामवर देखील आपल्या चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधत आहेत.

माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. यावेळी युवराज सिंहने बुमराहला अनेक हैराण करणारे प्रश्न विचारले. यावेळी त्याने बुमराहला धोनी आणि युवराजमधील एका जणाची निवड करण्यास सांगितली.

यावर उत्तर देताना बुमराह म्हणाला की, युवराज आणि धोनीमध्ये एकाची निवड करणे हे आई-वडिलांमधून एकाला निवडण्यासारखे आहे. मी एकाची निवड करू शकत नाही.

बुमराहने उत्तर टाळण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र युवराज वारंवार प्रश्न विचारत राहिला. अखेर युवराज म्हणाला की, धोनीची निवड केली असती तरी त्याला वाईट वाटले नसते.

या दरम्यान युवराजने सचिन आणि विराट यांच्यामध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण ? असाही प्रश्न विचारला. यावर आपण उत्तर देण्यासाठी एवढे अनुभवी नसल्याचे म्हणत बुमराहने उत्तर देणे टाळले.

Leave a Comment