VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोर्शेची ‘हवा’ करणाऱ्याची पोलिसांनी अशी काढली ‘हवा’


इंदूर : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारांवर पोहचला आहे. केंद्र, राज्य तसेच स्थानिक प्रशासनाकडून वारंवार विनंत्या करुन देखील अनेकजण बिनधास्त लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशा नियम तोडणाऱ्या शहाण्या लोकांना पोलिसांकडून कुठे फटके देऊन तर कुठे उठाबशा काढण्याची शिक्षा करुन सोडले जात आहे. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये घडला आहे. पोर्शे घेऊन विनामास्क रपेट मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी या तरुणाला अडवत मास्क का घातला नाही याची विचारणा केली. त्याला प्रतिउत्तर देताना तरुण उडवा उडवीची भाषा वापरत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला उठाबशा काठायची शिक्षा दिली.


मध्य प्रदेशातील बडगाव येथे आतापर्यंत 60 जण कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तेथे मागील 2 दिवसांत 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात मागच्या 24 तासांमध्ये 1990 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 5 हजार 803 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Leave a Comment