महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांना परत नेणार उत्तर प्रदेश सरकार


मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या नागरिक तसेच मजूरांना राज्यात परत नेणार असल्याचे जाहीर केले आहे. पण यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला अद्याप उत्तर प्रदेश सरकारने अधिकृतरित्या कळवले नसल्याची माहिती आहे. तसेच महाराष्ट्र सरकारसोबत महाराष्ट्रात असलेल्या मजुरांना नेण्यासाठी किती बसेस आणि कुठे येणार याबाबत अधिकृत्यरित्या चर्चा झालेली नाही किंवा सरकारला कळवले नसल्याचे समजते.

मागील आठवड्यात राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना योगी आदित्यनाथ यांनी खास बसची सोय करुन आपापल्या घरी परत आणल्यानंतर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांनांही परत आणणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Comment