राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची 7000 हजाराच्या दिशेने वाटचाल, मृतांची संख्या ३०० च्या पुढे


मुंबई – देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असून राज्य सरकार आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण राज्य सरकारला अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळालेले नाही. गेल्या 24 तासात राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 394 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची वाटचाल 7000 हजाराच्या दिशेने सुरु असून राज्यातील रुग्णांची संख्या 6817 झाली आहे. तर मृतांची संख्या 300 च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे २४ हजार ५०६ वर देशातील कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या पोहोचली असून देशभरात गेल्या २४ तासांत ५७ जणांचा मृत्यू तर १४२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात आढळलेल्या २४ हजार ५०६ जणांपैकी १८ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ५६०३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ७७५ झाली आहे.

Leave a Comment