जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 लाख 18 हजारांवर


मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात बळी पडलेल्यांचा आकडा 1 लाख 91 हजारांवर गेला आहे. तर आतापर्यंत जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 27 लाख 18 हजारांच्या घराच पोहचला आहे. त्याचबरोबर जगभरातील सात लाख 46 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे, तर अजून जवळपास 17 लाख 81 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील तीन टक्के म्हणजे 58 हजार 690 बाधित गंभीर आहेत. अमेरिकेमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक अमेरिकेमध्ये बळी गलेल्यांची संख्या आहे.

गेल्या 24 तासात अमेरिकेने 2325 लोक कोरोनामुळे गमावले आहेत. अमेरिकेत एकूण बळींची संख्या ही 49 हजार 845 वर जाऊन पोहोचली आहे. तर रुग्णांची संख्या आठ लाख 4880 हजारांवर गेली आहे. काल न्यूयॉर्क प्रांतात ५०७ बळी गेले असून, तिथे रुग्णांची संख्या २ लाख ६८ हजार ६०८ तर एकूण मृतांचा आकडा २०,८६१ झाला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत ५,४२८, मिशिगनमध्ये २,९७७, मासाचुसेट्स २३६०, लुझियाना १५९९, इलिनॉईस १६८८, कॅलिफोर्निया १५२३, पेनसिल्वानिया १६४५, कनेक्टिकट १६३९ आणि वॉशिंग्टनमध्ये ७११ लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.

स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात ४४० लोकांचा मृत्यु झाला असून २२ हजार १५७ वर एकूण मृतांचा आकडा पोहोचला आहे. तर इटलीत काल कोरोनाने ४६४ लोकांचा बळी घेतला आहे. आता इटलीतील एकूण बळींची संख्या २५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. इटलीतील रुग्णांची संख्या काल २ हजार ६४६ ने वाढली, इटलीत आता जवळपास १ लाख ९० हजार रुग्ण आहेत.

इंग्लंडमध्ये काल दिवसभरात ६३८ लोकांनी आपला जीव गमावला असून तेथील बळींचा आकडा १८,७३८ वर पोहोचला आहे. तर फ्रान्समधील ५१६ लोकांनी काल दिवसभरात आपला जीव गमावला आहे. तिथे आत्तापर्यंत २१ हजार ८५६ बळी, एकूण रुग्ण १ लाख ५९ हजारावर गेले आहेत. जर्मनीत काल २६० बळी गेले, एकूण बळींची संख्या ५,५७५ एवढी झाली आहे. तसेच इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ९० ची भर पडली असून तेथे एकूण ५,४८१ मृत्यू, तर रुग्णांची संख्या ८७ हजारावर पोहोचली आहे.

बेल्जियममध्ये कोरोनाने काल २२८ मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ६,४९० एवढा झाला आहे. हॉलंडमध्ये काल १२३ बळी घेतले तिथे एकूण ४,१७७ लोक दगावले आहेत. तर टर्की २४९१, ब्राझील ३३१३, स्वित्झर्लंडने १,५४९, स्वीडनमध्ये २०२१, पोर्तुगाल ८२०, कॅनडात २१४७, इंडोनेशिया ६४७, इस्रायल १९२ तर सौदी अरेबियात १२१ बळी कोरोनामुळे गेले आहेत. दक्षिण कोरियात काल २ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २४०झाला आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या ११ हजार ०५७ वर पोहोचली आहे, तिथे कोरोनाने २३५ लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८५,०२१ तर बळींच्या आकड्यात ६,६०१ ची भर पडली.

Leave a Comment