‘पॅरासाईट’मुळे का एसएस राजामौली झाले ट्रोल

बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली हे ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाईट’विषयी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात दक्षिण कोरियाच्या पॅरासाईट चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले होते. मात्र हा चित्रपट राजामौली यांना फारसा आवडला नाही. चित्रपट पाहता पाहता आपण झोपी गेल्याचे राजामौली यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीमध्ये राजामौली म्हणाले की, पॅरासाईट माझ्यासाठी नव्हताच. मला असे वाटते की चित्रपट सुरूवातीला खूपच स्लो आहे. आम्ही रात्री 10 च्या सुमारास हा चित्रपट पाहण्यास सुरूवात केली होती. मात्र अर्ध्यातच मी झोपी गेलो.

मात्र राजामौली यांनी दिलेली ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांना फारशी आवडली नाही. अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका युजरने लिहिले की, राजामौली यांच्या मते चित्रपट म्हणजे एखाद्या हिरोला घेऊन अवास्तव निर्मिती करणे असे असेल.

दरम्यान यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बाँग जून-हो दिग्दर्शित पॅरासाईटने सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर आणि सर्वोत्तम ओरिजन स्क्रिनप्ले हे पुरस्कार पटकावले आहेत.

Leave a Comment