कुस्तीपटू बबिता फोगाटकडून अर्णब गोस्वामींची पाठराखण


मुंबई – पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत रिपल्बिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी न्यूज चॅनेलवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. अनेक नेटीझन्संनी त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पत्रकार गोस्वामी यांच्यावर कदाचित, याच घटनेवरुन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. कुस्तीपटू बबिता फोगाटने गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तिने गोस्वामी यांना #IStandWithArnab या हॅशटॅगसह पाठिंबा दिला.


सोशल मीडियावर पालघर सामूहिक हत्याकांडाचे पडसाद चांगलेच उमटले होते. अनेकांनी याप्रकरणाला जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनेतशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली. कुठलाही धार्मिक रोष या घटनेमागे नाही, कुणी धार्मिक रंग देऊन राजकारण करु नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 101 आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही स्पष्ट केले.

आपल्या वृत्तवाहिनीवर या संदर्भात वार्तांकन करताना अर्णब यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली होती. त्यातच, अर्णब गोस्मावी यांच्या गाडीवर मध्यरात्री २ अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली असून पुढील तपास सुरु आहे. राष्ट्रकुल पदकविजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता अर्णब यांच्या समर्थनात आखाड्यात उतरली आहे. ती म्हणाली, देश बदलला आहे, कोणीतरी यांना समजवा. देशाचा आवाज लाठ्या-काठ्यांनी दाबू शकत नाही. घाबरायची गरज नाही, सडेतोड उत्तर द्या. #IStandWithArnab हा हॅशटॅग वापरला आहे.

Leave a Comment