दमदार इंजिनसह ‘ट्रायंफ स्ट्रिट ट्रिपल आरएस’ बाईक भारतात लाँच

ट्रायंफ मोटारसायक्लसने भारतीय बाजारात आपली 2020 ट्रायंफ स्ट्रिट ट्रिपल आरएस बाईक लाँच केली आहे. नवीन बाईक अपडेटेड स्टायलिंग,  अधिक फीचर्स आणि अपडेटेड इंजिनसोबत येईल. मात्र अपडेटेड बाईकची किंमत देखील जुन्या बाईकप्रमाणेच 11.13 लाख रुपये आहे.

ट्रायंफ स्ट्रिट ट्रिपल आरएस बाईकच्या फ्रंटमध्ये नवीन डिझाईनचे ट्विन-हेडलँम्प, प्लायस्क्रीन आणि एयर इंटेक्स देण्यात आलेले आहे. याशिवाय मिरर्समध्ये केलेले बदल, बेली पॅन, सीट काउल आणि नवीन पॅनल रियर यूनिट बाईकला अधिक शार्प लूक देतात. नवीन बाईकमध्ये टायटेनियम सिल्वर मेनफ्रेम आहे. बाईक अ‍ॅलिम्युनियम सिल्वर आणि पिवळ्या डेकल्ससोबत नवीन मॅट जॅट काळ्या रंगात येईल.

Image Credited – navbharattimes

बाईकमध्ये गोप्रो कॅमेऱ्यासोबत नवीन ब्लूटूथ-इनेबल टीएफटी इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. गोप्रो ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मॉड्यूलद्वारे ऑपरेट करता येईल. हे टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनसोबत येते, जे गुगलद्वारे संचालित आहे.

बाईकमधील सर्वात मोठा बदल इंजिनचा आहे. नवीन स्ट्रीट ट्रिपल आरएसमध्ये बीएस-6 कम्प्लायंट 765सीसी, लिक्विड-कूल्ड, इन-लाइन-ट्रिपल इंजिन देण्यात आले आहे, जे 123hp पॉवर आणि 79Nm टॉर्क जनरेट करते.

Image Credited – navbharattimes

बाईकमध्ये 5 रायडिंग मोड देण्यात आलेले आहेत. यात रोड, ट्रॅक, स्पोर्ट, रेल आणि रायडरचा समावेश आहे. बाईकच्या परफॉर्मेंसनुसार थ्रॉटल रिस्पॉन्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि एबीएस सेटिंग्समध्ये बदल करता येईल.

Image Credited – navbharattimes

कंपनीने नवीन स्ट्रीट ट्रिपल आरएस बाईकची बुकिंग सुरू केली असून, बुकिंग रक्कम 1 लाख रुपये आहे. बाईकची डिलिव्हरी लॉकडाऊन संपल्यानंतर सुरू होईल.

Leave a Comment