जनजागृतीसाठी मुंबई पोलीस घेत आहेत मायकल जॅक्सनपासून आलिया भट्टची मदत


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मेपर्यंत देशातील लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. मुंबई शहरात देशातील सर्वाधिक कोरोना बाधित आहेत. अशातच मुंबई महानगरपालिकेसोबतच मुंबई पोलिसांकडूनही मुंबईतील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच लोकांना समजवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग मुंबई पोलीस करत आहेत. त्याचबरोबर लोकांना समजवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मीम्सचा आधार घेतला आहे. आपल्या अभियानात मुंबई पोलिसांनी आलिया भट्टला सहभागी करून घेतले आहे. पोलिसांनी यामार्फत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घरामध्ये राहण्यासाठी प्रेरित केले आहे.


मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ‘गली बॉय’ चित्रपटातील लूकमध्ये हसणाऱ्या आलिया भट्टचा एक फोटो शेअर केला आहे. मीम्समध्ये लिहिल्यानुसार, हा तो चेहरा आहे, जो लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर फिरण्यासाठी जात आहे, असे कोणीतरी सांगितल्यावर होतो.


या मीम्ससोबत मुंबई पोलिसांनी एक कॅप्शन लिहिले आहे आणि ट्विट केलं आहे. एबॉर्ट मिशन. आम्ही पुन्हा सांगतो आहे : एबॉर्ट मिशन!’ तसेच यासोबत #StayHome #StaySafe हे हॅशटॅगही दिले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटी, त्यांचे चित्रपट आणि लोकप्रिय ऑन स्क्रिन पात्रांच्या विशेषतेचे अनेक ट्विट्स पोस्ट केले आहेत. यामध्ये लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

आलिया मुंबई पोलिसांच्या ट्विटमध्ये पहिल्यांदाच दिसून आली आहे. त्यांनी याआधी घरातच राहण्याचे आवाहन करण्यासाठी लोकप्रिय चित्रपटांच्या नावांचा उपयोग करत एक संदेश दिला होता. त्यांनी ट्विट केले होते की, मुंबईकर, आम्ही आशा करतो की, तुम्ही सगळेजण मिस आलियाच्या बोलण्याशी ‘राजी’ आहात. कामाशिवाय ‘गली’मध्ये जाऊ नका आणि आपल्या डिअर जि़ंदगी’ची काळजी घ्याल.

Leave a Comment