हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सर्वाधिक 171 रुग्ण; पुण्यात एकूण 772 रुग्ण


पुणे – पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत असून काल दिवसाखेर पुणे शहरात 772 कोरोनाग्रस्त आढळले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत आढळले आहेत. भवानी पेठेत 171 नवे रुग्ण आढळल्यामुळे पुणेकरांसाठी ही चितेंची बातमी आहे.

काल दिवसभरात पुणे शहरात कोरोना विषाणूंचे 64 रुग्ण नव्याने आढळले असून आता रुग्णांची संख्या 772 झाली आहे. तर काल 4 रुग्णाचा बळी गेला असून एकूण बळींची संख्या 56 झाली आहे. 14 दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 122 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. याच दरम्यान शहरातील मध्य भाग कोरोना विषाणूंचा बाधित म्हणून पुढे आला आहे. भवानी पेठ 171, कसबा विश्राम बाग 111 आणि ढोले पाटील 110 या तीन भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, प्रशासनामार्फत हे भाग सील करण्यात आले आहे. या भागासह शहरातील रुग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना प्रशासनमार्फत करण्यात येत आहेत.

Leave a Comment