अफवांना लगाम लावणार फेसबुकचे ‘गेट्स द फॅक्ट’ फिचर


नवी दिल्ली : जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातलेले असतानाच सोशल मीडियावर कोरोनासंदर्भातील अनेक अफवा व्हायरल केल्या जातात. आता फेसबुकने खोटी माहिती आणि अफवांवर रोख लावण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचे फिचर फेसबुक घेऊन आले आहे. खोटी माहिती आणि अफवा पसरवणे या फिचरमुळे थांबवण्यास मदत मिळणार आहे.

याबाबत मीहिती देताना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, मार्च महिन्यापासूनच खोटी माहिती पसरवणे थांबविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आता आमचा हा प्रयत्न आम्ही प्रत्क्षात आणणार आहोत. त्याचबरोबर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोरोना व्हायरसबाबत आम्ही लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून खोट्या माहितीवर रोख लावण्याचे काम करत आहोत.

झुकरबर्ग पुढे म्हणाले की, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच आम्ही खोट्या अफवांवर रोख लावण्यासाठी काम करत आहोत. आम्ही आता जवळपास 12 देशांमध्ये 60 पेक्षा जास्त फॅक्ट चेक संस्थांसोबत एकत्र येऊन 50 भाषांमध्ये पसरणाऱ्या अफवा थांबवण्याचे काम करत आहोत. माहिती खोटी किंवा खरी असल्यास त्यावर लेबलही लावण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना झुकरबर्ग म्हणाले की, आम्ही यामध्ये आता पुढे जाऊन आणखी एक फिचर आणले आहे. आम्ही गेट्स द फॅक्ट नावाचे एक फिचर लॉन्च करणार आहोत. जे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफवांवर लगाम लावण्याचे काम करणार आहे. आतापर्यंत फेसबुकच्या ज्या युजर्सकडे खोटी माहिती पोहोचली आहे. त्यांना आम्ही मेसेज पाठवून त्यासंदर्भातील खरी माहिती पुरवणार आहोत.

Leave a Comment