राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 232 नवीन रुग्णांची वाढ


मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल कोरोनाच्या 232 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2916 वर पोहोचली आहे. दरम्यान, काल राज्यात 9 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 2 जण मुंबईत, 6 पुण्यात तर अकोला मनपा येथील एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या हजार नमुन्यांपैकी 48 हजार 198 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत; तर 2916 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 69 हजार 738 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 5617 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 6 पुरूष तर 3 महिला आहेत. त्यातील 4 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 3 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 9 रुग्णांपैकी 6 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.

Leave a Comment