यामुळे जितेंद्र आव्हाडांना शेअर करावा लागला आपला रिपोर्ट


मुंबई – कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे. आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाची आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला कोरोना झाल्याने कोरोना चाचणी घेण्यात आली. आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाला कोरोना झालेला नसल्याचे त्यामध्ये सिद्ध झाले. पण असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. पण त्यानंतरही काही प्रसार माध्यमांनी आव्हाड यांना कोरोना झाल्याचे वृत्त दिले. यावरच संतापलेल्या आव्हाड यांनी आपल्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट आता ट्विटवर पोस्ट केला आहे.


आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये आपण ठणठणीत असून रस्त्यावर उतरुन मी काम करत आहे. पण माझ्या नावाचा वापर काही वृत्तवाहिन्यांनी टीआरपीसाठी केला आहे. लोक त्यांच्याकडील अशा बातम्या बघतात असे त्यांना वाटते, असा टोला वृत्तांकन करणाऱ्या काही वाहिन्यांना आव्हाड यांनी ट्विटवरुन लगावला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये आपल्या कोरोना चाचणीच्या रिपोर्टचा फोटो पोस्ट केला आहे. एएनआय आणि पीटीआय या दोन प्रमुख वृत्तसंस्थांना त्यांनी टॅग केले आहे. एका महिन्यापासून मी बराच भटकत होतो. पण इतरांबरोबर जो चांगला वागतो देव त्याचे भले करतो, असे देखील आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment