सुरु झाले मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट


नवी मुंबई : आजपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा बटाटा मार्केट सुरु करण्यात आले असून मार्केटमध्ये आज १८० गाड्या दाखल झाल्या आहेत. भाजी मंडईत गर्दी होत असल्याने हे मार्केट शनिवारी बंद करण्यात आले होते. हे मार्केट चार दिवसांनंतर पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आता मार्केटमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ठराविक गाड्या आता सोडण्यात येत आहेत.

दरम्यान, अद्याप मसाला आणि दाणा मार्केट सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबईतील हा व्यापारी असल्यामुळे या व्यापाऱ्याच्या संपर्कात कोण आले, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. व्यापारी कोरोना बाधित आढल्याने मसाला मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment