लॉकडाऊन : नागरिकांनी घरात राहण्यासाठी येथे ‘भूत’ देत आहेत पाहारा

जगभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांनी घरात राहावे यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र आता इंडोनेशियामध्ये नागरिकांनी घरात राहण्यासाठी हटके पद्धत वापरली जात आहे.

इंडोनेशियाच्या केपूह गावात चक्क भूत रस्त्यावर पाहारा देत आहेत व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर चक्क हमला करत आहेत. जावा बेटावरील या गावातील नागरिकांनी लोकांना घरातच राहण्यासाठी चक्क भूतांची नेमणूक केली आहे. हे भूत रस्त्यावर पेट्रोलिंग करतात.

गावातील युथ ग्रुपचा प्रमुख असलेला अंजर पंचानिंग्टी म्हणाला की, आम्हाला काहीतरी वेगळे आणि प्रभावी असे करायचे होते. पोकोंग भयानक आहे. हा ग्रुप पोलिसांबरोबर मिळून या हटके पद्धतीद्वारे नागरिकांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करतात.

पोकोंगला इंडोनेशियामध्ये भूत समजले जाते. हे सर्वसाधारणपणे पांढऱ्या कपड्यात असतात. त्यांच्या चेहऱ्यावर पावडर असते व डोळे देखील पांढरे गडद असतात.

सुरूवातीला या हटके पद्धतीचा उलटा परिणाम झाला. लोक भूताला घाबरण्याऐवजी पाहण्यासाठी बाहेर येऊ लागले. मात्र त्यानंतर बदल करत लोकांना घाबरवले जाऊ लागले.

गावचे प्रमुख प्रियादी म्हणाले की, कोव्हिड-19 चा प्रसार कसा रोखावा या संदर्भात नागरिक जागृक नाहीत. त्यांना नेहमीप्रमाणेच सर्वसाधारण आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे त्यांना घरात राहण्यासाठी सांगत नियमाचे पालन करण्यास लावणे अवघड आहे.

दरम्यान, इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. देशात आतापर्यंत 4 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment