मास्कविना सायकल स्वारी करणारा शोएब अख्तर झाला ट्रोल


पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तो त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याच्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोलही केले जात आहे.

शुक्रवारी रात्री अख्तरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यावरुन सायकल चालवित आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मास्क आणि हेल्मेटसुद्धा परिधान केलेले नाही. या व्हिडिओमध्ये अख्तर इस्लामाबादचे कौतुक करीत आहे आणि तेथील इमारतींबद्दल सांगत आहे. यावर लोक अख्तरला ट्रोल करत आहेत.


एका वापरकर्त्याने लिहिले की शोएब भाई तुम्ही लॉकडाऊनचे पालन केले पाहिजे, जर तुम्हीच पालन करणार नसलात तर इतर ते कसे करतील. एका वापरकर्त्याने सांगितले की आपण देशासमोर एक उदाहरण ठेवले पाहिजे.

कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी निधी उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचाही अख्तरने प्रस्ताव दिला होता. तो म्हणाला की यामुळे भरपूर निधी जमेल आणि दोन्ही देशांना बरीच मदत होईल. यावर कपिल देव म्हणाले की, भारताला पैशांची गरज नाही. याखेरीज अख्तर म्हणाला होता की, जर भारत पाकिस्तानला १०,००० व्हेंटिलेटर देईल तर पाकिस्तान हे कधीही विसरणार नाही. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती.

Leave a Comment