ठाकरे सरकारची आमदारांच्या वेतन कपातीला मंजुरी


मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला मंजुरी दिली असून ही कपात एप्रिल महिन्यापासूनच होणार आहे. त्याचबरोबर हा निर्णय वर्षभरासाठी घेण्यात आला आहे. केंद्राच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असे म्हटले होते. आता आमदारांच्या वेतन कपातीला महाराष्ट्र सरकारनेही मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी कोरोनाविरोधातील लढाईसाठी वापरण्यात येणार आहे.

Leave a Comment