कोरोनाविरोधातील लढाईसाठी ट्विटरचे सीईओ करणार साडेसात हजार कोटी रुपयांची मदत


नवी दिल्ली – कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर (अंदाजे ७ हजार ६२० कोटी) मदत करणार असल्याची घोषणा ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी केली आहे. यासाठी डॉर्सी यांनी स्क्वेअर इन, या कंपनीमधील आपले मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. स्क्वेअरचे डॉर्सी हे सहसंस्थापक असून तेच सध्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. डिजीटल पेमेंट क्षेत्राशी संबंधित काम ही कंपनी करते.


ट्विटरच्या माध्यमातूनच ही माहिती डॉर्सी यांनी दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आपल्या एकूण संपत्तीपैकी २८ टक्के वाटा दान करणार असल्याचे यामध्ये डॉर्सी यांनी नमूद केले आहे. अशा संस्थांना ही मदत देण्यात येणार आहेत ज्या जगभरामध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन कमाईसंदर्भात काम करणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे या निधीमधून मुलींचे आरोग्य आणि शिक्षणसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही मदत केली जाणार असल्याचे डॉर्सी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment