फेक न्यूज थांबविण्यासाठी व्हॉट्सॲपमध्ये मोठा बदल

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचे नाव जरी उच्चारले तरी लोक घाबरत आहे. अशा स्थितीमध्ये या संदर्भातील खोटी माहिती असणारे मेसेज देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यामुळे आता इंस्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

व्हॉट्सॲपने फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजबद्दल लिमिट निश्चित केली आहे. जे मेसेज अनेकवेळा फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत, ते मेसेज आता केवळ एकदाच कोणालाही फॉरवर्ड करता येणार आहे. अनेकदा फॉरवर्ड केलेल्या मेसेज म्हणजेच यापुर्वी जो मेसेज 5 पेक्षा अधिकवेळा फॉरवर्ड करण्यात आलेला आहे. हे नवीन नियम जगभरात लागू होतील.

लॉकडाऊनमुळे व्हॉट्सॲप फॉरवर्डचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. नवीन नियमांनुसार अनेकवेळा पाठवण्यात आलेला मेसेज एकाच व्यक्तीला पाठवता येईल. मात्र असे असले तरी युजर्स मेसेज कॉपी करून चॅट बॉक्समध्ये पेस्ट करून पाठवू शकतात. यामुळे काही प्रमाणात फेक न्यूज रोखण्यास मदत मिळेल.

व्हॉट्सॲपने मागील वर्षी फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजसाठी लेबल लावण्यास सुरूवात केली होती, ज्याद्वा युजर्सला आधीच फॉरवर्ड मेसेजची माहिती मिळते.

याशिवाय, रिपोर्टनुसार युजर्स फॉरवर्ड मेसेजला ऑनलाईन सर्च करून सत्यता पडताळू शकतो, अशा फीचरचे व्हॉट्सॲप टेस्टिंग करत आहे.

Leave a Comment