कोरोना : हॅरी पॉटरच्या लेखिकेने सुचवला हा वेगळाच उपाय

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, लाखो लोकांना याची लागण झाले आहे. हॅरी पॉटर पुस्तकाच्या लेखिका जेके रॉलिंग यांना देखील कोरोना व्हायरसच्या लक्षणांनी ग्रासले होते. मात्र एका उपायाद्वारे त्या या लक्षणांमधून बाहेर पडल्या आहेत व बऱ्या झाल्या आहेत.

डॉक्टर पती निल मुर्रे यांच्याकडून श्वसनासंबंधी लक्षणं कशी दूर करायची याचा सल्ला घेत असल्याचे देखील रोलिंग यांनी सांगितले.

रोलिंग यांनी ट्विटरवर लंडनच्या क्विन हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोना व्हायरसच्या लक्षणांमधून बरे होण्यासाठी उपाय सांगितले आहेत. रोलिंग यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी पुर्णपणे बरी झाली असून, या टेक्निकचा खूपच फायदा झाला.

व्हिडीओमध्ये डॉक्टर सांगत आहे की, पाचवेळा दीर्घ श्वास घ्या व प्रत्येकवेळी 5 सेंकद श्वास रोखून धरा व सोडा. सहाव्या वेळेस तोंड झाकून मोठा खोकला घ्या. असे दोनदा करा. त्यानंतर 10 मिनिटे हळूवार श्वास घेत आडवे पडून रहा.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील जेके रोलिंगचा हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, याद्वारे मदत मिळू शकते आणि निश्चितच तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही.

Leave a Comment