ठाकरेंच्या मातोश्रीजवळचा चहावाला करोना पोझिटिव्ह, १०० पोलीस क्वारंटाइन


फोटो सौजन्य महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाजवळ चहाची टपरी चालविणाऱ्या चहावाल्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यावर मातोश्रीवर संरक्षणासाठी नेमलेल्या १०० हून अधिक पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे समजते. ठाकरे यांच्या या निवासस्थानी १७० पोलीस बंदोबस्तावर असतात असे समजते. खबरदारीच्या उपाय म्हणून १०० पेक्षा अधिक पोलिसांना क्वारंटाइन केले गेले असल्याचे सांगितले जात आहे. मातोश्रीच्या गेट नंबर दोन जवळ ही चहाची टपरी आहे.

वांद्रा येथील हा सर्व परिसर सॅनीटाइज केला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्टहाउस येथून जवळच असल्याचे समजते. कलानगर सील केले गेले असून येथील वाहतूक बंद केली गेली आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबई येथे करोना संसर्गाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. मुंबईतील अनेक जागा करोना हॉटस्पॉट म्हणून निश्चित केल्या गेल्या असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment