मुंबईत कोरोना; धारावीतील डॉक्टरलाच कोरोनाची लागण


मुंबई : अर्ध्यापेक्षा मुंबई शहरावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यात आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने शिरकाव केल्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे. धारावीत आणखी एक कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. धारावी मेन रोड येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेथील परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, या डॉक्टरच्या संर्पकात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

डॉक्टर कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो राहत असलेली इमारती सील करण्यात आली आहे . मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हा डॉक्टर सर्जन असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनाही संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या त्यांच्यावर रहेजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान जर तुमच्याजवळ कोरोना व्हायरसची लागण असलेली व्यक्ती आली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमुळे समजू शकणार आहे. सरकारने कोरोनाशी संदर्भात आरोग्य सेतू अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये हिंदी, इंग्रजीसह अन्य ११ भाषा आहेत. या अॅपमध्ये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांनी माहिती भरायची आहे. त्यानंतर आर्टिफिशल इंटेलीजंटनुसार अॅप आपल्या आसपास कोणी कोरोना बाधित रुग्ण आला तर अलर्ट नोटीफिकेशन देते.

Leave a Comment