कोरोना; हात मिळवणे आणि गळाभेटीला मिळू शकते तिलांजली

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नागरिक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहेत. यासोबतच या व्हायरसमुळे अभिवादन करण्याची परंपरा देखील बदलू शकते. पश्चिमेकडील देशांमध्ये लोक आता हात मिळवण्यास आणि गळाभेट घेणे टाळत आहेत.

व्हायरस नष्ट झाल्यावरही मनुष्याचा स्वभाव आणि त्याची सामाजिक स्थिती देखील बदलू शकते. यासोबतच काही सवयींमध्ये देखील मोठा बदल होऊ शकतो.

ब्रिटनच्या नॉटिंघम ट्रेट यूनिवर्सिटीचे समाज विज्ञानाचे प्रा. रॉबर्ट डिंगवॉल यांच्यानुसार, सामाजिक आणि सामुदायिक अंतराचा मानवी जीवनावर खोल परिणाम पाहण्यास मिळेल.

डिंगवॉल यांच्यानुसार, ज्याप्रमाणे आताची स्थिती आहे त्यानुसार कमीत कमी पुढील 5 वर्ष लोक एकमेंकांना अभिवादन करण्यासाठी अलिंगन देणार नाहीत.  लोकांना सावधगिरी बाळगण्याची सवय झाली आहे, जी आता दूर करणे कठीण होईल.

एका अभ्यासानुसार, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये  90 टक्के लोक हसून एकमेकांना अभिवादन करत आहेत. तर 50 टक्के युवक मित्रांशी हात मिळवण्या ऐवजी हॅलो बोलत आहेत.

वैज्ञानिकांनुसार, स्पर्श केल्याने एकमेंकाना ताकद मिळते. याद्वारेच व्यक्तीगत आणि सामाजिक संबंध मजबूत होतात. मात्र व्हायरसमुळे हे कमी होईल व याचे दुरगामी परिणाम पाहण्यास मिळेल.

Leave a Comment