गुणकारी पाण्यामुळे इटलीच्या या गावात नो करोना


फोटो सौजन्य विकिपीडिया
इटली मध्ये करोना विषाणूने हाहाक्कार माजविला असताना येथील एका गावात मात्र करोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही. त्यामागे या गावाचे गुणकारी पाणी आणि स्वच्छ हवा असल्याचा स्थानिकांचा विश्वास आहे. पूर्व इटलीतील पियोडमोंट मधील तुरीन शहरापासून हे गाव २० किमीवर असून गावाचे नाव आहे मोन्ताल्डो टोरीनीज. विशेष म्हणजे तुरीन शहरात करोनाच्या ३६०० केसेस आढळल्या आहेत आणि पियांटमॉर मध्ये हा आकडा ८२०० केसेस असा आहे.

असे सांगतात की नेपोलियन बोनापार्टच्या १८०० सैनिकांना न्युमोनिया झाला होता तेव्हा मोन्ताल्डो टोरीनीज येथे आणले गेले होते आणि काही दिवसात त्या सर्व सैनिकांचा न्युमोनिया बरा झाला होता. या गावाच्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर आहे आणि येथील पाणी अतिशय गुणकारी आहे त्यामुळे गावातील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. या गावात तसेही अन्य रोग होणाऱ्यांचे प्रमाण जवळ जवळ नाहीच असे समजते. अर्थात करोना संबंधी योग्य ती सर्व खबरदारी येथे घेतली जात असून लोकांना मास्क आणि सॅनीटायझर वाटले जात आहेत असेही समजते.

Leave a Comment