24 तासात जगभरातील 61 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 3719 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : साऱ्या जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे. जगभरात गेल्या 24 तासात 61 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 7 लाख 84 हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 37 हजार 639. 3419 लोकांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच 20 हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये 913 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची अमेरिकेत वाढ झपाट्याने होत आहे. अमेरिकेत एकाच दिवसात 20 हजार 353 नवीन घटना समोर आल्यानंतर त्याने एक नवीन विक्रम स्थापित केला. अमेरिकेत सध्या एकूण 1 लाख 63 हजार 479 कोरोनाची प्रकरणे आहेत. मृतांची संख्या 3,146 झाली आहे. दुसरीकडे, स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत आतापर्यंत 913 लोकांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला. यासह, स्पेनमधील एकूण मृतांचा आकडा 7,716 वर पोहोचला आहे. तेथे 7846 नवीन प्रकरणे आढळून आली असून एकूण प्रकरणांची संख्या 87 हजार 956 पर्यंत वाढली आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त बळी चीनपेक्षाही इटलीमध्ये गेले आहेत. 812 लोकांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला, ज्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 11 हजार 591 पर्यंत वाढली आहे. येथे 4050 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि एकूण प्रकरणे 1 लाख 01 हजार 739 पर्यंत वाढली आहेत. तर, फ्रान्समध्ये एकाच दिवसात 418 लोक मरण पावले, त्यानंतर एकूण मृत्यूची संख्या 3024 वर गेली आहे. येथे 4376 नवीन लेसेस बाहेर आल्या आहेत आणि एकूण प्रकरणे 44 हजार 550 वर गेली आहेत.

कोरोना संक्रमणाची जर्मनीमध्ये 4450 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि एकूण प्रकरणे 66 हजार 885 वर वाढली. येथे संक्रमणामुळे 104 लोकांचे प्राण गमावले, ज्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 645 वर गेली आहे. तर, इराणमध्ये एका दिवसात 3186 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि एकूण प्रकरणे वाढून 41 हजार 495 झाली. येथे 117 लोक मरण पावले, त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 2757 वर गेली आहे. ब्रिटनमध्येही आतापर्यंतच्या सर्वाधिक एकाच दिवसात संक्रमणाची 2619 प्रकरणे नोंदली गेली. एकूण प्रकरणे येथे 22 हजार 141 पर्यंत वाढली आहेत.

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. सोमवारी लॉकडाउनचा 6 वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच गेली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.

Leave a Comment