बीएसएफचा जवान कोरोनाग्रस्त; 50 जवान क्वारंटाईन


भोपाळ – कोरोनाची मध्य प्रदेशातील एका बीएसएफ जवानाला लागण झाल्याचे समोर आले असून कोरोनाची या जवानाला लागण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. लागण झालेल्या जवानासोबत असलेल्या 50 इतर जवानांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बीएसएफ जवानांचे मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात टेकनपूर येथे आधुनिक ट्रेनिंग सेंटर आहे. या सेंटरमधील एका अधिकाऱ्याची तपासणी केली असता त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेल्या जवानाची पत्नी नुकतीच लंडनवरुन भारतात परतली होती. त्यामुळे पत्नीद्वारे या जवानाला कोरोनाची लागण झाली असावी, असे सांगितले जात आहे.

दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक लोकांना देशातील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Comment