इटलीत आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू


रोम : कोरोनामुळे इटलीमध्ये मोठी दहशत पसली आहे. कोरोनामुळे इटलीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हजारो लोकांना या व्हायरसची लागण झाली असून या शहरांमध्ये कोरोनाचा वाढता विळखा अधिक घट्ट होत असल्याचे पाहायला मिळतत आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांचा इटलीमध्ये मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासांत 889 लोकांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 92, 472 लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

देशाच्या उत्तरेकडील भागात 21 फेब्रुवारी रोजी COVID-19 या साथीने धुमाकूळ घातला आहे. लोकांच्या मनात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथे आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद कऱण्यात आली आहे. चीननंतर सर्वात जास्त धोका इटलीमध्ये असल्याचे समोर आले आहे.

इटलीतील 589 लोकांनी या महासंकटात यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 400 नव्या लोकांना इटलीमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजारहून अधिक लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महासंकटावर मात करण्यासाठी जगभरात अनेक शास्त्रज्ञ लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. चीननंतर इटलीत सर्वात जास्त धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Leave a Comment