सरफरोशमधील गाण्याद्वारे पोलिसांचे नागरिकांना घराबाहेर न पडण्याची विनंती


मुंबई : राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पण असे असेल तरी देखील बरेचसे लोक संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या नियमांना केराची टोपली दाखवत घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर काही पोलीस आता थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत.


‘सरफरोश’ चित्रपटातील ‘जिंदगी मौत ना बन जाए’ हे गाणे गात बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. या पोलिसाचा व्हिडीओ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विटरवर शेअर केला आहे. संगीताद्वारे पोलिसांनी केलेले आवाहन आता तरी लोक ऐकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment