किंग ऑफ पॉपलाही होती करोनाची भीती, केली होती भविष्यवाणी


फोटो सौजन्य कॅच न्यूज
किंग ऑफ पॉप म्हणून ओळख असलेला अमेरिकेचा पॉप स्टार मायकेल जॅक्सन याने पूर्वीच करोना सारखा भयानक विषाणू जगभरातील लोकांच्या जीवावर उठेल अशी भविष्यवाणी केली होती असा दावा त्याच्या एका बॉडीगार्डने केला असल्याचे वृत्त ‘ द सन डॉट कॉम’ वर दिले गेले आहे. मॅट फिडेस असे या बॉडीगार्डचे नाव असून त्याने अनेक दशके मायकेल साठी काम केले आहे.


मायकेलने खूप वर्षापूर्वीच जागतिक महामारी येणार असे भविष्य वर्तविले होते आणि त्याबद्दल त्याची खूप टर उडविली गेली होती असे फिडेसचे म्हणणे आहे. तो म्हणतो, मायकेलला जगाला नैसर्गिक संकटाचा धोका कायम राहणार अशी भीती होती आणि त्यामुळे तो कायम जागरूक राहत असे. तो नेहमी म्हणूनच तोंडाला मास्क बांधत असे. मायकेल नेहमीच भविष्यात काय होऊ शकेल याची भाकिते करत असे असेही या बॉडीगार्डचे म्हणणे आहे.

मायकेल काही वेळा एका दिवसात चार चार देशात प्रवास करत असे. विमानातून जाताना तो मास्क आवर्जून वापरत असे आणि आम्हालाही मास्क वापरा अश्या सूचना देई असे फिडेसचे म्हणणे आहे. कुठला तरी विषाणू जगभर नक्की पसरणार आणि त्यात लाखो लोक मरणार हे त्याला भीती होती आणि आता ती भीती खरी ठरते आहे असे फेडीसचे म्हणणे आहे.

Leave a Comment