लॉकडाऊन : गरजू मित्राच्या घरी ड्रोनने पाठवले टॉयलेट पेपर

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी स्वतःला घरात कैद केले आहे. सरकारने देखील लॉकडाऊन केल्याने सर्व दुकाने, शॉप्स बंद आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देखील मिळणे अवघड झाले आहे.

अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्ये तर टॉयलेट पेपरचा तुटवडा जाणवू लागला आहे. लोकांना टॉयलेट पेपर मिळत नाही. यातच सॅन फ्रांसिस्को येथील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत येथे एक मित्र आपल्या मित्राच्या मदतीला धावून आला आहे.

सॅन फ्रांसिस्कोमध्ये एका जणाच्या घरी टॉयलेट पेपर संपले होते. त्यामुळे दुसऱ्या मित्राने त्याची मदत करण्यासाठी चक्क ड्रोनच्या मदतीने टॉयलेट पेपर घरी पाठवले.

इयान चॅन नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या घरातील टॉयलेट पेपर संपले होते. अशा परिस्थितीत एका मित्राने ड्रोनद्वारे टॉयलेट पेपर घरी पाठवत, त्याला सरप्राईज दिले.

Leave a Comment