आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद ; मी घरी राहणार आणि कोरोनाला हरवणार


मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याची माहिती देतानाच कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला संकल्प करण्याची गरज आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी घरी राहणार आणि कोरोनाला हरवणार हा संकल्प करूया, असे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देखील दिल्या.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. राज्यातील कोरोनाचे रुग्ण आज बरे होत आहेत. ही आनंदाची बाब असल्यामुळे आता आणखी संसर्ग होणार नाही याची खबरदारी म्हणून आपण घरी बसून कोरोनाशी दोन हात करूया, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

तसेच अनेकजण मुंबई – पुण्याहून आपल्या गावी जात आहेत. पण अशा नागरिकांना गावकऱ्यांनी गावाच्या बाहेरच रोखून ठेवले आहे. पण असे करू नका. मुंबई पुण्याहून जे कोणी आले आहेत. ते आपलेच लोक आहेत त्यांना सहकार्य करा. त्यांची तपासणी करा आणि त्यांची काळजी घ्या, असेही राजेश टोपे म्हणाले.

Leave a Comment