अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आरबीआयने एका दिवसात उभारले वॉर रुम

आरबीआयने आपल्या कर्मचाऱ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी देशाची आर्थिक प्रणालीला सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ एका दिवसात वॉर रुमची स्थापना केली आहे. आणीबाणीच्या स्तरावर बनविण्यात आलेले हे वॉर रूम आरबीआयच्या 90 महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जात आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरबीआयने ही व्यवस्था आकस्मिक कार्य योजनेंतर्गत तयार केली आहे. 19 मार्चपासून येथे 24 तास काम सुरू आहे. येथे आरबीआयचे महत्त्वपुर्ण 90 कर्मचारी काम करत आहेत. या व्यतिरिक्त बाहेरील वेंडर्सचे 60 तर अन्य सुविधेसाठी 70 लोक वॉर रुममध्ये कार्यरत आहेत.

या वॉर रुममध्ये एकावेळी 45 कर्मचारी काम करतात व इतर कर्मचारी आणीबाणीच्या स्थितीसाठी राखीव आहेत.

अधिकाऱ्यानुसार, भारतासह जगात पहिल्यांदाच कोणत्याही केंद्रीय बँकेने बीसीपीची अंमलबजावणी केली आहे. या प्रकारची योजना कोणाकडेच नाही. सर्वसाधारणपणे आरबीआयच्या सर्व कार्यालयांमध्ये 14 हजार लोक काम करतात. सध्या ज्या सेवाचे कार्य वॉर रुममध्ये केले जात आहे, तेथे 1500 लोक काम करतात.

या वॉर रुममध्ये कर्ज व्यवस्थापन, राखीव व्यवस्थापन आणि आर्थिक कार्ये हाताळली जातात. बीसीपी अंतर्गत आरबीआयच्या अखत्यारित असलेली आर्थिक संदेश प्रणाली, आरटीजीएस आणि एनईएफटी सारख्या महत्त्वपुर्ण सेवा सांभाळल्या जात आहेत. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारची देवाण-घेवाण आणि एका बँकेकडून दुसऱ्या बँकेशी होणाऱ्या व्यवहारांवर देखरेख केली जात आहे.

Leave a Comment