चक्क बायकोने हॅक केले होते भुवनेश्वर कुमारचे फेसबुक अकाउंट

भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. मात्र वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील काही दिवसांपासून फेसबुकपासून लांब आहे. या संदर्भात भुवनेश्वर खुलासा केला असून, आपल्या पत्नीमुळे फेसबुक वापरणे बंद केल्याचे त्याने सांगितले. भुवनेश्वरच्या पत्नीने त्याचे फेसबुक अकाउंट हॅक केले होते.

क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुवनेश्वरने या संदर्भात खुलासा केला. त्याने सांगितले की, पत्नी नुपुरमुळे फेसबुक वापरणे सोडले होते.

भुवनेश्वरने सांगितले की, एकदा नुपुरने त्याच्याकडे फेसबुक अकाउंटचा पासवर्ड मागितला होता. त्यावर भुवनेश्वरने प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक स्पेस असते, असे उत्तर दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नुपुरने त्याला त्याच्या फेसबुक अकाउंटचा हा नवीन पासवर्ड असल्याचे सांगितले. नुपुरने फेसबुक अकाउंट हॅक केले होते, असे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने काही दिवसांपासून फेसबुक वापरणे बंद केले आहे.

दोघांचीही भेट 13 वर्षांपुर्वी झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले व दोघांनी 2017 साली लग्न केले होते.

Leave a Comment