संशोधन; उष्णतेमुळे कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रसार

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि दररोज या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूच्या पार्श्वभुमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे.  वाढते तापमान आणि वातावरणातील दमटपणामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव कमी होऊ शकतो, अशी माहिती एका अभ्यासात समोर आली आहे.

बेइहांग आणि सिंघुआ यूनिवर्सिटीद्वारे चीनमधील 100 गरम शहरांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात समोर आले की, जास्त गर्मी आणि दमटपणाद्वारे कोरोनाला नष्ट करता येणार नाही, मात्र याच्या प्रसारावर काही प्रमाणात अंकुश घालता येईल.

रिपोर्टनुसार, चीनच्या 100 शहरांमध्ये तापमान वाढल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग असलेल्या रुग्णांची सरासरी संख्या 2.5 वरून 1.5 वर आली आहे.

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये या व्हायरसचा प्रसार सुरू झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये या महामारीच्या संपर्कात एका दिवसात तब्बल 15 हजार लोक आले होते. आता वातावरण बदलासोबत कोरोनाग्रस्तांचे प्रमाण देखील कमी होत चालली आहे.

Leave a Comment