कोरोना : डब्ल्यूएचओच्या या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मिळणार लेटेस्ट अपडेट्स

कोरोना व्हायरसच्या प्रसारासोबतच या संदर्भातील अफवा देखील वेगाने पसरत आहेत. या व्हायरस संदर्भात लोकांना अचूक व योग्य माहिती मिळण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेने व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केला आहे.

या नंबरवर मेसेज केल्यानंतर रोबोट युजर आपल्याला कोरोनासंदर्भातील माहिती देईल. यामुळे कोरोना संदर्भातील खरी माहिती लोकांपर्यंत पोहचेल व अफवांवर रोख बसेल.

आरोग्य संघटनेप्रमाणेच भारत सरकारने देखील व्हॉट्सअ‍ॅपवर MyGov कोरोना हेल्पडेस्क सुरू केले आहे.

कोरोनासंदर्भातील माहितीसाठी युजर्स जागतिक आरोग्य संघटनेच्या +41-79-893-18-92 नंबरवर मेसेज करू शकतात. याद्वारे युजर्स कोरोनाविषयी सर्व माहिती मिळवू शकतील. येथे तुम्हाला माहिती हवी असलेला पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर वेब रोबॉटद्वारे तुम्हाला त्या संदर्भात माहिती मिळेल.

Leave a Comment