इटलीमध्ये कोरोनाचे थैमान : शुक्रवारी 627 लोकांचा मृत्यु


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर इटलीमध्ये कायम असून आज अनेक देशांमध्ये चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेला प्रसार जाऊन पोहोचला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे इटलीमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हायरसचा फटका चीन पेक्षा ही अधिक इटलीला बसत आहे. जगभरातील देश मृतांचा वाढता आकडा पाहता चिंतेत आले आहेत. आता हा व्हायरस भारतात ही दाखल झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या भारतात देखील वाढत चालली आहे.

जगासाठी आज कोरोना व्हायरस चिंतेचा विषय बनला आहे. हा व्हायरस चीनपासून संपूर्ण जगात पसरत आहे. पण कोरोनाचा सर्वाधिक कहर हा इटलीमध्ये पाहायला मिळतो आहे. कोरोनाने इटलीमध्ये शुक्रवारी तब्बल 627 लोकांचा जीव घेतला आहे. तर कोरोना झालेले नवीन 5986 रुग्ण समोर आले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत एकूण 4032 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 47,021 वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरस इटलीमध्ये खूप जलद गतीने पसरत आहे. इटलीमध्ये 2,655 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी येथील मृतांचा आकडा हा चीन पेक्षा हा अधिक होता. इटली आणि चीनमध्ये वृद्धांची संख्या जास्त असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. कोरोना हा वृद्ध व्यक्तींना लवकर होत असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणातून पुढे आले आहे.

Leave a Comment