
बॉलीवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम सध्या कुटुंबासह दुबईत अडकला असून करोना पासून बचावासाठी दुबईत आयसोलेशन मध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवारी सोनूने ऑनलाईन कॉन्सर्ट करणार असल्याचे सांगितले असून भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता रसिक सोनूच्या सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा घरबसल्या आनंद घेऊ शकतील.
जनता कर्फ्यू दिवशी सोनू निगमची ऑनलाईन कॉन्सर्ट
सिंगर कणिका कपूरचे इंग्लंड हून आगमन आणि करोना संसर्ग लपवून केलेली पार्टी, यामुळे अनेकांना संसर्गाचा निर्माण झालेला धोका याची चर्चा सुरु असतानाचा सोनुने हा निर्णय जाहीर केला आहे. सोनुचा मुलगा दुबई मध्ये शिक्षण घेतो, त्याची शाळा बंद झाली आहे. मात्र भारतात परतून विलगीकरण करण्याचा भार आरोग्यविभाग आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर टाकण्यापेक्षा परिस्थिती निवळेपर्यंत दुबईतच थांबणे योग्य ठरेल असे सोनुचे म्हणणे आहे.
