ऑलिम्पिकसाठी प्लान बी चा विचार करणार आयओसी


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
जगात वेगाने पसरत चाललेल्या कोविड १९ विषाणूच्या प्रभावामुळे अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द केल्या गेल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर जपानच्या टोक्यो ऑलिम्पिकचे काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने या स्पर्धा नियोजित वेळेत घेतल्या जातील असे जाहीर केले असले तरी अन्य पर्यायांचा विचार सुरु केला आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आणि टास्क फोर्स याचा सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचे आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितले.

ते म्हणाले या स्पर्धा अजून साडेचार महिन्याने होत आहेत. त्यामुळे त्या रद्द करणे अथवा पुढे ढकलण्याबाबत आत्ताच काही जाहीर करणे योग्य नाही. मात्र ऑलिम्पिक कमिटीचे आयोजक या स्पर्धा रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त करत आहेत. तसे झाले तर ही ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच विषाणूमुळे स्पर्धा रद्द होण्याची घटना असेल. यापूर्वी जागतिक महायुद्धाच्या वेळी स्पर्धा रद्द झाली होती. काही वेळा नैसर्गिक आपत्ती मुळे स्पर्धा ठरलेल्या ठिकाणी न होता अन्यत्र घेतल्या गेल्या आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी किती व्यायसायिक स्पर्धक येऊ शकतील याची अजून स्पष्ट माहिती नाही. कारण ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यामुळे कोविड १९ संक्रमण झालेल्या देशातील ४३ टक्के ऑलिम्पिकपतटूना त्यांची पात्रता सिध्द करण्याची संधीच मिळालेली नाही असेही समजते.

Leave a Comment