दुबईमध्ये एका सात वर्षीय मुलाला तब्बल 10 लाख डॉलर्सची लॉटरी लागल्याचे समोर आले आहे. एवढी मोठी रक्कम जिंकणारा सात वर्षीय मुलगा भारतीय असून, तो दुबईतील अजमन येथे राहतो. मुलाचे वडील मागील 27 वर्षांपासून दुबईत राहत आहेत.
अरेच्चा ! 7 वर्षीय भारतीय मुलाला लागली तब्बल 10 लाख डॉलर्सची लॉटरी
कनकराज यांनी सांगितले की, त्यांचा 7 वर्षीय मुलगा कपिलराज हट्ट करत असल्याने त्यांनी हे तिकीट खरेदी केले होते. त्यांनी हे तिकीट 21 फेब्रुवारीला खरेदी केले होते.
त्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच लॉटरी खरेदी करून नशीब तपासले. लॉटरी लागल्याचा अजून विश्वास बसत नाही. लॉटरीच्या पैशांना ते आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि व्यवसायामध्ये गुंतवतील.
कनकराज मुळचे तामिळनाडू येथील आहेत. कामाच्या निमित्ताने ते दुबईला गेले होते. आता ते कुटुंबासोबत तेथेच राहतात.
